आपल्याला हवा तसा समाज निर्माण करायचा असेल तर आपल्यालाच स्वतःहून पुढाकार घेऊन अपेक्षित समाजाची निर्मिती करणे गरजेचे आहे. पुढच्या पिढीला घडवत असताना गेल्या पिढ्यांनी अनुभवातून मिळवलेले शहाणपण त्यांना संस्कारातून देण्याची जबाबदारी ज्या पिढीची आहे ती आपली पिढी.
मागच्या पिढीचे आदर्श जोपासणे व पुढच्या पिढीला संस्कारित करणे हे सामाजोन्नातीचे ध्येय घेऊन नेक्स्टजेन ऑर्गनायझर्स फौडेषण आता विस्तारित स्वरूपात कार्य करू लागली आहे.
गेल्या सात दशकाहून अधिक केलेल्या कार्याच्या अनुभवाचे पाडबळ घेऊन एन. जी. ओ. (नेक्स्टजेन ऑर्गनायझर्स फौडेषण) हि संस्था गेल्या वीस वर्षात एका विशिष्ट ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग प्रशस्त करीत आली आहे.
या सारख्या समाज उपयोगी उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन आपल्या संपर्कातील लोकांना संस्थेकडून साहाय्य प्रदान करण्यात व संस्थेच्या विकास कार्यात योगदान देण्याकरिता एन. जी. ओ. चे सदस्य व्हावे सदस्य होण्याकरिता आपली प्रारंभिक माहिती दिलेल्या फोर्म मध्ये नमूद करावी